¡Sorpréndeme!

TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 21 April 2025 | ABP Majha

2025-04-21 1 Dailymotion

TOP 70 Superfast News | टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा | 7 AM | 21 April 2025 | ABP Majha

 उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा, ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संदीप देशपांडेंकडून आठवण

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर शरद पवारांचा बोलण्यास नकार

माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस करणार डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

बुलढाण्यातील नखं गळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी पथक नियुक्त, आज केस आणि नखं गळती झालेल्या गावांचा दौरा करणार

अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार